अखेर तो सापडलाच! दर्शना पवार हत्या प्रकरणीतील फरार मित्र राहुल हंडोरेला अटक, हत्येचं नेमकं कारण?

अखेर तो सापडलाच! दर्शना पवार हत्या प्रकरणीतील फरार मित्र राहुल हंडोरेला अटक, हत्येचं नेमकं कारण?

| Updated on: Jun 22, 2023 | 4:04 PM

तिचा मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यावरून राज्यातील राजकारण ही तापलेलं होतं. त्याचदरम्यान तिचा मृत्यू नेमका का झाला हे पाहणयासाठी पोस्टमार्टम करण्यात आलं होतं. ज्यात तिचा मृत्यू नाही तर हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं होतं.

पुणे : MPSC स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. तिचा मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यावरून राज्यातील राजकारण ही तापलेलं होतं. त्याचदरम्यान तिचा मृत्यू नेमका का झाला हे पाहणयासाठी पोस्टमार्टम करण्यात आलं होतं. ज्यात तिचा मृत्यू नाही तर हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं होतं. तर मृत्यूवेळी तिच्या सोबत असणारा तिचा मित्र राहुल हंडोरे हा फरार होता. त्याचा शोध पोलिस घेत होती. पोलीसांना आता यात यश आलं असून त्यांनी हंडोरेला मुंबई येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याला अटक करण्यात आली असून पुण्यात नेण्यात आलं आहे. तर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. तर दर्शनाचे दुसर्‍या मुलासोबत जमवले जात असल्याच्या कारणाने त्याने तिचा खून केला अशी कबुली दिली आहे.

Published on: Jun 22, 2023 04:04 PM