Sharad Pawar: शरद पवारांनी घेतली दत्ता भरणेंची सांत्वनपर भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरजाबाई विठ्ठल भरणे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
इंदापूर – राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatraya bharane) यांच्या आईचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वृत्ताची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad pawar) यांनी भरणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरजाबाई विठ्ठल भरणे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. माजी राज्यमंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या मातोश्री गिरजाबाई विठ्ठल भरणे यांचे दुःखद निधन झाले आहे, त्यांचे वय वय अंदाजे 80 वर्ष होते, दीर्घ आजारपणाने त्यांना माळशिरस(Malshirs) जिल्हातील अकलूज येथील इनामदार हॉस्पिटल या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते.
Published on: Jul 02, 2022 02:30 PM
Latest Videos