अकोला शहरात दिवसा जमावबंदीचे आदेश, काय आहे कारण?
अकोल्यात सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून मोठ्या प्रमाणात दोन गटांमध्ये राडा झाला होता. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. तर या दगडफेकीमध्ये आठ जण आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
अकोला : शहरात दिवसा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अकोल्यात सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून मोठ्या प्रमाणात दोन गटांमध्ये राडा झाला होता. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. तर या दगडफेकीमध्ये आठ जण आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.तर एकाचा मृत्यू झाला होता. अकोल्यातील राड्याप्रकरणी पोलिसांनी 75 जणांना ताब्यात घेतलं आहे. शहरात तीन दिवसांपासून 144 कलम लागू करण्यात आला. अकोल्यातील या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत तीन दिवसांनंतर बदल करण्यात आले आहेत. आज सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी आणि रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा ही सुरु करण्यात आली आहे.तर जमावबंदीचे आदेश देताच आज सकाळपासून भाजी मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळाली.