अजितदादांची नाराजी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गैरहजेरी, नेमक काय घडतंय? पाहा स्पेशल रिपोर्ट
शिंदे गटाचे आमदार गायकवाड म्हणतात की काही विक्षिप्त पोलीस अधिकाऱ्यांमुळे लाठीचार्ज झाला. त्यामागे सरकारचे आदेश नव्हते. तर खासदार संजय राऊत यांचा आरोप आहे की आदेश मंत्रालयातूनच गेले होते. काल विरोधकांनी जालन्यात उपोषणकर्त्यांना भेट दिली. त्यावरुन राजकीय आरोप - प्रत्यारोप रंगू लागले आहेत.
मुंबई : 3 सप्टेंबर 2023 | जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर अजितदादा गटाचे आमदार नाराज असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार बुलढाणा येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गेले नसल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याआधी अनेक कार्यक्रमांना मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांनी सोबत हजेरी लावली. पण, सरकारी दौऱ्यानिमित्त फडणवीस लडाख दौऱ्यावर आहेत, तर अजित पवारांची प्रकृती खराब असल्याने ते कार्यक्रमाला आले नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस यांनी जालना घटनेवर प्रतिक्रिया देताना दगडफेकीनंतर लाठीचार्ज झाल्याचं म्हटलं. तर अजित पवार गटाचा पहिल्या दिवसापासून लाठीचार्जविरोधात सूर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी परिस्थिती हाताबाहेर का गेली याची सत्यता लवकरच समोर आणू, असे आश्वासन दिले. मग नेमकी सरकारमध्ये धुसफूस आहे का ? पाहा हा स्पेशल रिपोर्ट