‘ढेकूण आणि सरडा म्हणून…’, संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर

| Updated on: Aug 18, 2024 | 5:29 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुलाबी सरडा असा उल्लेख करत अजित पवारांवर बोचरी टीका केली होती. तर राऊतांच्या या बोचरी टीकेवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राऊतांना दुतोंडी सापाची उपमा दिली तर अजित पवार यांनीही पलटवार केला आहे.

Follow us on

ढेकूण आणि सरडा म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार का? महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. विरोधक आम्हाला शिव्या शाप देत आहेत, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबी सरडा बारामती सोडणार, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. ‘सरडा रंग बदलतो पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो. आता हा गुलाबी सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलं आहे. कुठे जाणार हे माहिती नाही. परंतु गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला रंग भगवा आहे’, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित दादांवर नाव न घेता घणाघात केला होता. यावरच अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बघा काय म्हणाले अजित पवार?