‘अरे पठ्ठ्या यात तू फुशारकी मारली का? ‘लाडकी बहीण’ योजना काय तुझ्या…’, अजितदादांचा कोणावर निशाणा?

| Updated on: Sep 22, 2024 | 4:25 PM

राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. यापूर्वी राज्यात सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चांगलीच हवा महिलांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र विरोधकांकडून ही योजना आम्ही सत्तेत आल्यानंतर बंद करू असे सांगितले जात आहे. यावरूनच अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. ‘आम्ही सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू’, असं काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार हे नागपुरात म्हणाले होते. यावरूनच अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधत त्यांना आपल्या शैलीतून प्रत्युत्तर दिलं आहे. अरे पठ्ठ्या यात तू फुशारकी मारली का? योजना काय तुझ्या वडिलांची आहे का? असा आक्रमक सवालही अजित पवार यांनी सुनील केदार यांना केला आहे. तर योजना बंद करायची नसेल तर घड्याळ या चिन्हाचं बटण दाबा… असं यावेळी जाहीर सभेतून बोलताना अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. बघा अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Published on: Sep 22, 2024 04:24 PM
‘दम नाही बुआ, नमस्कार’…. अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?