संजय राऊत यांना जीवे धमकी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Devendra Fadnavis on Sanjay Raut Death threats : संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा व्हीडिओ...
नागपूर : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांना जी धमकी आली आहे, त्याची मी प्राथमीक माहिती घेतली आहे.
दारूच्या नशेत त्यांना ही धमकी दिली आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. महाराष्ट्रामध्ये कोणालाही धमकी देण्यात आली तर सरकार, गृहखातं आणि पोलीस शांत बसणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दोषींवर जरूर कारवाई होईल, असा शब्दही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
Published on: Apr 01, 2023 01:15 PM
Latest Videos