Satara News : मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल झाला; अन् एकनाथ शिंदेंनी ‘त्या’मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
DCM Eknath Shinde : सातारा जिल्ह्यातील मजूर महिलेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या 3 वर्षांच्या चिमूकल्याला चक्क भर उन्हात दगडाला बांधून ठेवत मजुरी करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधला दानवली या दुर्गम खेडेगावातील हा व्हिडिओ आहे. बाळ लहान असल्याने कुठे जाऊ नये, त्याला काही होऊ नये आणि पोटापाण्यासाठी आपल्याला चार पैसे कमवता यावेत म्हणून एका महिलेने तापत्या उन्हात आपल्या 3 वर्षांच्या चिमूरड्याला दगडाला बांधलं. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत या मजूर कुटुंबाची सगळी जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on: Mar 24, 2025 08:47 PM
Latest Videos

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
