Eknath Shinde : कालची घटना ही साजिश होती, पण.. ; एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
DCM Eknath Shinde On Nagpur Violence : विधिमंडळाच्या अधिवेशनात नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असं म्हणत विरोधकांना चांगलंच धारेवर धरलेलं बघायला मिळालं.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू आहे. ते कशासाठी? कोणी सुरू केलं? याच्या मुळाशी सरकार जाईल. पण अशा प्रकारे औरंगजेबाच उदात्तीकरण करण हे आपल्या शंभू राजांचा, आपल्या शिवबाचा अपमान करणं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आज. आज विधिमंडळाच्या अधिवेशनात नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलेलं बघायला मिळालं. हा देशद्रोह आहे, असंही यावेळी शिंदेंनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला लागलेला औरंगजेब नावाचा कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत. हे चुकीचे नाही. ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केले, त्यांच्याही खाणाखुणा आपण पुसून टाकल्या. आक्रमणकाऱ्यांच्या खाणाखुणा आपण पुसून टाकतो. या औरंगजेबाने तर जुलमी राज्यकारभार केला. अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, समर्थन करणे, हे महाराष्ट्र सहन करणार नाही, माफ करणार नाही. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. नागपुरातील काल झालेला हिंसाचार एक पूर्वनियोजित घटना असल्याचाही संशय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावर बोलताना ते म्हणाले की, या भागात दररोज 100 ते 150 दुचाकी पार्क होत होत्या. पण तिथे काल एकही गाडी पार्क नव्हती. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. हॉस्पिटलला लक्ष्य करण्यात आलं. एक 5 वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. त्या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळले. फायर ब्रिगेडची गाडी जाळली, पोलिसांवर हल्ला केला. हे सर्व पूर्व नियोजित असल्यासारखं वाटतं, असा संशय शिंदेंनी घेतला.

नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं

नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत

दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
