आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी, देशमुख यांचे राणे कुटुंबाला आव्हान काय?

आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी, देशमुख यांचे राणे कुटुंबाला आव्हान काय?

| Updated on: Feb 05, 2023 | 4:53 PM

अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली असून राणे कटुंबाविरोधात बोलल्यामुळे ही धमकी आली आहे असा संशय आमदार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात बोलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले, निलेश राणे आणि नितेश राणे यांचे नाव घेऊन मला जीवे मारण्याची धमकी अली […]

अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली असून राणे कटुंबाविरोधात बोलल्यामुळे ही धमकी आली आहे असा संशय आमदार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात बोलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले, निलेश राणे आणि नितेश राणे यांचे नाव घेऊन मला जीवे मारण्याची धमकी अली आहे. आतापर्यंत मुंबईत अनेक लोकांना समुद्रात मारून फेकून दिले. त्याचा पत्ता त्यांच्या नातेवाईकांनाही लागला नाही. तुम्हालाही तसेच मारून समुद्रात फेकून देऊ असे वक्तव्य धमकी देणाऱ्याने केले आहे. हे कॉल रेकॉर्ड केले आहेत. मी त्याला मंगळवारी मुंबईला येतो. नारायण राणे या, नितेश राणे या, निलेश राणे कुणीही या मी तुमची नरिमन पॉंईट येथे वाट पाहतो असे आव्हान दिले आहे. मात्र, धमकी देणाऱ्याने जो उल्लेख केला त्यावरून असे किती जणांना मारून समुद्रात फेकण्यात आले याची शासनाने चौकशी करावी अशी मागणीही आमदार देशमुख यांनी केली आहे.

Published on: Feb 05, 2023 04:53 PM