राज्यात चाललंय तरी काय ? आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खरंच आहे का असा प्रश्न निर्माण होणाऱ्या या घटनेची दहशत अद्याप कायम असतानाचा पुन्हा एक सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. तुळजापूरमध्येही बीडच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून तेथील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाला आहे.
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण राज्यभरातील वातावरण तापलेलं असून उद्या या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खरंच आहे का असा प्रश्न निर्माण होणाऱ्या या घटनेची दहशत अद्याप कायम असतानाचा पुन्हा एक सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. तुळजापूरमध्येही बीडच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून तेथील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याचे उघड झाले आहे.
मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा अतिशय धक्कादायक, खळबळजनक प्रकार घडला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगडाने फोडून आणि पेट्रोल टाकून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने प्रचंड दहशत माजली आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगामध्ये हा भयानक प्रकार घडला आहे.