“मंदा म्हात्रेंनी भाजप प्रवेशाचं आश्वासन दिलं होतं”, दीपा चौहान यांचा गंभीर आरोप
मंदा म्हात्रे यांनी पक्षप्रवेशाचं आश्वासन दिलं होतं असा आरोप दीपा चौहाण यांनी केला आहे. "मंदा ताईंना मी मंदिरात जाऊन भेटले होते. मला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे, असं मी त्यांना सांगितलं होतं.
मुंबई : दीपा चौहान प्रकरण भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांच्या चांगलंच अंगलट आलेलं दिसत आहे. गेल्यावेळी दीपा चौहान यांनी एका पत्रात मंदा म्हात्रे आणि विजय चौगुले यांच्यावर अनेक आरोप केले होते. गणेश नाईकांविरोधात तक्रार करण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी मला प्रवृत्त केल्याचा दावा दीपा चौहान केला होता. यानंतर आता मंदा म्हात्रे यांनी पक्षप्रवेशाचं आश्वासन दिलं होतं असा आरोप दीपा चौहाण यांनी केला आहे. “मंदा ताईंना मी मंदिरात जाऊन भेटले होते. मला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे, असं मी त्यांना सांगितलं होतं. मग ताईंनी मला घरी बोलावलं. मी तुला मदत करेन असं त्या बोलल्या. ताईनी मला समोरून एक ऑफर दिली, शिवसेनेत जाऊन गणेश नाईक यांच्याविरोधाक उभं राहण्यास सांगितलं होतं. मविआ सरकार गेल्यावर भाजपात प्रवेश देऊ असं म्हात्रे म्हणाल्या होत्या”, असं दीपा चौहान म्हणाल्या.