...तर मुख्यमंत्री शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते, दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा

“…तर मुख्यमंत्री शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते”, दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा

| Updated on: Jun 21, 2023 | 6:37 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला काल 20 जूनला एक वर्ष पूर्ण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काल राज्यात विरोधकांकडून गद्दार दिवस तर शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला.दरम्यान आता शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला काल 20 जूनला एक वर्ष पूर्ण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काल राज्यात विरोधकांकडून गद्दार दिवस तर शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला.दरम्यान आता शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. ते सच्चे मनुष्य आहेत. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटलं असतं की मी केलेला हा उठाव यशस्वी होणार नाही, तेव्हा मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता आणि म्हणालो असतो की, माझी चूक झालेली आहे. पण यामध्ये या लोकांची चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.”

Published on: Jun 21, 2023 06:37 AM