ठाकरे गटाला एकला चलो शिवाय पर्याय नाही, शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल

“ठाकरे गटाला एकला चलो शिवाय पर्याय नाही”, शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Jul 04, 2023 | 1:53 PM

अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले त्यांना एकला चलो रे शिवाय दुसरा इलाज नाही. त्यांना जो सल्ला मिळाला होता तो चुकीचा होता. आज स्टेजवर येऊन जे भाषण करताय त्यांचाच तो सल्ला असावा, असा टोला केसरकर यांनी लगावला,” असं दीपक केसरकर म्हणाले.

 

Published on: Jul 04, 2023 01:53 PM