Deepak Kesarkar : तुमच्या पक्षाच्या नव्हे तर देशाच्या घटनेनुसार कारभार चालतो, दीपक केसरकरांचा संजय राऊतांना टोला

Deepak Kesarkar : तुमच्या पक्षाच्या नव्हे तर देशाच्या घटनेनुसार कारभार चालतो, दीपक केसरकरांचा संजय राऊतांना टोला

| Updated on: Jul 28, 2022 | 7:30 PM

आम्ही आदरापोटी काही बोलत नाहीत. मात्र तुम्ही आमच्याबद्दल असे बोलणार असाल तर आम्ही देखील उत्तर देऊ शकतो. त्यांनी गद्दारऐवजी विश्वासघातकी शब्द वापरावा, आमच्याबद्दल एकतर्फी वक्तव्य करू नका जेणेकरून गैरसमज होईल, असे दीपक केसरकर म्हणाले.

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 10 शेड्यूल व्यवस्थित वाचावे. निलंबन हे सभागृहातील कामकाजासंदर्भात होवू शकते. तुमच्या पक्षाच्या घटनेनुसार नव्हे तर देशाच्या घटनेनुसार देश चालतो. कुठे दाद त्यांना मागायची आहे तिकडे मागू देत. आम्ही कायदेशीर लढाई लढू, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की त्यांना दिवसा स्वप्न बघायची सवय झाली आहे. आम्ही गुवाहाटीत असतानाही ते असेच बोलायचे. जे सोबत आहेत ते जावू नये यासाठी ते बोलतायत. ज्यांनी शिवसेना (Shivsena) वाढवली, त्या वरिष्ठ नेत्यांना भेटले तर त्यात काय वेगळे आहे, असे ते म्हणाले. आम्ही आदरापोटी काही बोलत नाहीत. मात्र तुम्ही आमच्याबद्दल असे बोलणार असाल तर आम्ही देखील उत्तर देऊ शकतो. त्यांनी गद्दारऐवजी विश्वासघातकी शब्द वापरावा, आमच्याबद्दल एकतर्फी वक्तव्य करू नका जेणेकरून गैरसमज होईल, असे केसरकर म्हणाले.

Published on: Jul 28, 2022 07:30 PM