“मी खासदारकीची निवडणूक लढवणार, विनायक राऊत यांचा पराभव करणार”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं सूचक विधान
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील पक्ष कामाला लागले आहेत.महाराष्ट्रात अनेकजण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीवर सूचक वक्तव्य केलं आहे.
सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील पक्ष कामाला लागले आहेत.महाराष्ट्रात अनेकजण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीवर सूचक वक्तव्य केलं आहे.पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पराभवाची चव चाखणार, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत केलं आहे. “महाभारतात श्रीकृष्णाने सागितलं होतं युद्धात जरी आपला भाऊ समोर असला तरी त्याच्याशी युद्ध करायचा आणि त्याचा पराभव करायचाच,त्यानुसार जर पक्षाने मला आदेश दिले तर निश्चित राऊत यांचा पराभव करणार”.यावर विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केसरकर कोणत्या पक्षातून लोकसभा लढवणार, असा खोचक प्रश्न राऊत यांनी विचारला.