अधिवेशनात एकच चर्चा; सोडूण गेलेल्या हातांनी उद्धव ठाकरे यांना नमस्कार
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात आले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. यावेळी ते आत येतात न येतात तेथे दीपक केसरकर होते.
मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. हा अर्थसंकल्प फडणवीस-शिंदे सरकारचा पहिलाच आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले 40 आमदार आज उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ठाकरे गटातील नेते हे शिंदे गटावर टीका करतात. तर त्या टीकेला उत्तर देण्याचे काम शिंदे गटाकडून होत असते. यात दीपक केसरकर हे पुढे असतात. पण जे हात ठाकरेंना सोडूण गेले तेच आज त्यांच्यासमोर जोडले गेल्याने सगळीकडे चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात आले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. यावेळी ते आत येतात न येतात तेथे दीपक केसरकर होते. त्यांनी शिंदे गटातील केसरकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत असतानाच केसरकरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. पुन्हा पुन्हा नमस्कार केल्याने उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. सध्या याचीच चर्चा सुरू आहे.