Deepak Kesarkar on Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात, असे दिपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई : मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात तसं मी सांगत असतो. चार दिवसात होईल असं सांगितलं तेव्हा सीएमनी सांगितलं होतं. काही कारणामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा वेळ वाढला. मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील तेव्हाचं विस्तार होईल. दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात, असे दिपक केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सततच्या दौऱ्यामुळे तब्येतीवर ताण आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना डाँक्टरांनी एका दिवस आरामाचा सल्ला दिलाय.
Published on: Aug 04, 2022 08:21 PM
Latest Videos