Deepak Kesarkar On Sanjay Raut | संजय राऊतांना ED च्या अटकेनंतर दीपक केसरकर म्हणतात

| Updated on: Jul 31, 2022 | 9:20 PM

ईडीला तपासात काही पुरावे मिळाले असतील किंवा त्यांनी जे प्रश्न विचारले असतील, त्यांना संजय राऊत उत्तर देऊ शकले नसतील आणि त्यामुळे कारवाई झाली असेल. 

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी राऊतांवरील कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही पुरावा मिळाल्याशिवाय कोणालाही ईडी ताब्यात घेत नाही.  कारण कोर्टाच्या पुढे जाऊन ईडीला पुरावे सादर करावे लागतात. ईडीला तपासात काही पुरावे मिळाले असतील किंवा त्यांनी जे प्रश्न विचारले असतील, त्यांना संजय राऊत उत्तर देऊ शकले नसतील आणि त्यामुळे कारवाई झाली असेल.  महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणातअनेक बिल्डरवरसुद्धा कारवाई झाली आहे, असे केसरकर म्हणाले.

Published on: Jul 31, 2022 09:20 PM