Special Report |…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गाडी फोडली असती
किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला या आरोपावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी धक्कादायक विधान केले आहे. किरीट सोमय्यांच्या गाडीच्या जागी त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी असती तरी ती फोडली असती असे वादग्रस्त विधान त्यांनी केले
किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला या आरोपावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी धक्कादायक विधान केले आहे. किरीट सोमय्यांच्या गाडीच्या जागी त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी असती तरी ती फोडली असती असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. त्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांवर बोलले म्हणून राणा दांपत्यांवर जर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलल्याबद्दल त्यांच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले आहे.
Latest Videos