घाई करा, आता फक्त तीन दिवसांची मुदतवाढ; मुंबई विद्यापीठात 15 जूनपर्यंतच नाव नोंदणी करता येणार
पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी 19 जून रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क 27 जून पर्यंत भरता येईल.
मुंबई : पदवी अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. येथे प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीसाठी आता फक्त 3 दिवसांची मुदत राहीलेली आहे. विद्यापीठाकडून नोंदणीसाठी आता ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर आता विद्यार्थ्यांना 15 जून रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदवता येईल. पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी 19 जून रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क 27 जून पर्यंत भरता येईल. तर दुसरी यादी बुधवारी 28 जूनला जाहीर होईल याचा कालावधी 5 जुलै पर्यंत असेल. तर पदवी प्रवेशाची तिसरी यादी 6 जुलैला प्रसारीत केली जाईल. ज्याची प्रक्रिया 10 जुलैपर्यंतच राहील.