Nandurbar | साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीला विलंब, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Nandurbar | साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीला विलंब, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

| Updated on: Feb 06, 2022 | 1:11 PM

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अनेक भागात ऊस (Sugercane) परिपक्व होऊनही तोडणीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस तोडणी करावी म्हणून शेतकरी (Farmers) कारखान्यांचा चकरा मारत आहेत.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अनेक भागात ऊस (Sugercane) परिपक्व होऊनही तोडणीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस तोडणी करावी म्हणून शेतकरी (Farmers) कारखान्यांचा चकरा मारत आहेत. मात्र खराब रस्ते असल्याने वाहतूकदार वाहतूक करण्यास तयार नसल्याचे कारण देत ऊसतोडणी लांबणीवर पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऊस तोड न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. ऊसतोड वेळेत तोड न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेतकरी कारखान्यांकडे ऊसाची नोंदणी करून मगच लागवड करत असतात. आता तोडणीच्या वेळेस खराब रस्त्यामुळे ऊस तोडणीसठी उशीर होत असून त्या ठिकाणाहून वाहतूकदार वाहतुकीसाठी तयार नाहीत. त्यामुळे उशीर होत असल्याची प्रतिक्रिया कारखान्याकडून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची कैफियत समजून घेत त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.
Published on: Feb 06, 2022 01:10 PM