मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले हुकूमशाही…
Delhi Elections 2024: आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. दिल्लीतील सातही जागांवर आज मतदान पार पडत आहे.
Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांसाठी आज मतदान होत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी खास बातचीत केली. ते म्हणाले की, सध्या तापमान जास्त प्रमाणात आहे. पण नागरिकांनी काळजी घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवला पाहिजे. असं माझं सर्वांना आवाहन आहे. जनतेने आज हुकूमशाही, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मतदान केले पाहिजे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे
Published on: May 25, 2024 02:02 PM
Latest Videos