फडणवीस यांच्या टोल्यावर राऊत याचं प्रत्युत्तर म्हणाले, ‘काय वाईट…’
मोदींना हरवण्यासाठी सापनाथ-नागनाथ एकत्र आले असतील तर येऊ द्या असं म्हटलं होतं. तसेच उद्धव ठाकरे पाच वर्षे ज्यांच्यासोबत सत्तेत होते त्यांचा म्हणजेच आमचा साधा फोनही घेतला नाही. आता मात्र ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली होती अशांना मातोश्रीवर बोलवून बटाटेवडे खाऊ घालत आहेत अशी टीका केली होती.
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येत भेट घेतली होती. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा काहीही परिणाम होणार नाही. मोदींना हरवण्यासाठी सापनाथ-नागनाथ एकत्र आले असतील तर येऊ द्या असं म्हटलं होतं. तसेच उद्धव ठाकरे पाच वर्षे ज्यांच्यासोबत सत्तेत होते त्यांचा म्हणजेच आमचा साधा फोनही घेतला नाही. आता मात्र ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली होती अशांना मातोश्रीवर बोलवून बटाटेवडे खाऊ घालत आहेत अशी टीका केली होती. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. त्यांनी, फडणवीस काय बोलतात ते बोलू द्या. मात्र त्यांच्याकडून आम्हाला बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावे असं म्हटलं आहे. तर बाळासाहेबांनी कधी गद्दारांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा मारून हाकलून द्या असं सांगितलं होतं. पण फडणवीस गद्दाराच्या गाड्या चालवतायत” अशी वाईट वेळ त्यांच्यावर आली आहे.