Ashok Chavan | अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी, अशोक चव्हाण यांची माहिती

Ashok Chavan | अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी, अशोक चव्हाण यांची माहिती

| Updated on: Aug 11, 2022 | 4:12 PM

Ashok Chavan | पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी झाल्याचा दावा करत तो वाढवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Ashok Chavan | पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) कालावधी सहा दिवसांचा असला तरी तो कमी आहे. त्यामुळे तो आणखी वाढवण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. विधानसभा आणि विधानपरिषदेत आता अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील नुकसानीसंदर्भात चर्चा होणार आहे. प्रश्नोत्तराचा तास असेल, अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली. येत्या 17 ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. पण हे अधिवेशन केवळ सहा दिवसांचं आहे आणि ते वाढवण्याची मागणी विरोधकांनी (Opposition) केली आहे. चव्हाण यांच्या मते आणखी दोन दिवस अधिवेशन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची गुरुवारी (11 ऑगस्ट) बैठक झाली. त्यात याविषयीचा निर्णय घेण्यात आला. तसेच शिवसेनेच्या आमदारांना समितीत स्थान देण्याविषयची चर्चा ही झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Published on: Aug 11, 2022 04:12 PM