“मोदींनी फक्त दिवास्वप्न पाहिलं”, पण…; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका
तीन दिवसांपूर्वी निर्णय घेताना आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रक काढले. त्यावरून आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. याचमुद्द्यावरून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
सोलापूर : देशात दुसऱ्यांदा नोटबंदी करण्यात आली आहे. 2016 मध्ये 1000 आणि 500 च्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. तर यावेळी 2000 ची नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोटा चलनातून परत घेतली. याबाबत तीन दिवसांपूर्वी निर्णय घेताना आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रक काढले. त्यावरून आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. याचमुद्द्यावरून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी देशात प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. तर मोदींनी कॅशलेस सोसायटी आणायचा प्रयत्न केला व जगात एकाही देशांमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था झालेली नाही. तर रोकड संपून टाकायची हे दिवास्वप्न मोदींनी पाहिलं. 2000 ची नोट फक्त काळा पैसा साठवूण ठेवण्यासाठी केली होती. भाजपच्या नेत्यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. आता त्या पुढच्या निवडणुकीच्या आधी काढायच्या आहेत. म्हणून असं करण्यात आलं.