‘साठीपार! गेलेत, पण’; अजित पवार यांच्याकडून गिरिष महाजन यांचे कौतूक, इर्शाळवाडी दुर्घटनेच्या कामावर ही बोलले
यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, शिंदे गटासह भाजपमधील नेते उपस्थित होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
पुणे, 06 ऑगस्ट 2013 | येथे मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, शिंदे गटासह भाजपमधील नेते उपस्थित होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी आपल्या भाजषणात अजित पवार यांनी राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांचे तोंड भरून कौतूक केलं. त्यांनी महाजन यांच्याबाबत बोलताना, इर्शाळवाडी दुर्घटेनेवरून प्रतिक्रिया दिली. यावेळी तेथे पहाटे पहाटे लवकर कोण गेलं असेल तर ते गिरीष महाजन. जेथे जाताना अग्निशमन दलाच्या जवानाला जाताना हृदयविकाराचा झटका आला पण महाजन ट्रेक सारख्या पायवाटेतून घटनास्थळी गेले. त्यांनी तेथे काम केलं. हे फक्त त्यांच्या फिटनेसमुळे झाल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. तर गिरीष महाजन हे आमच्या मंत्रिमंडळातील सगळ्यात फिट मंत्री असल्याचेही पवार यांनी म्हटलं आहे. तर महाजन हे साठीच्या पुढे गेले पण कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेले अशी कोपरखळी मारली आहे. याचबरोबर महाजनांनी त्यांचं आरोग्य फिट ठेवलं आहे. महाजनांचा दंड मी नेहमीच दाबून बघतो. ते खूप फिट आहेत, असं म्हणत असताना त्यांनी उपस्थितीतांना असा फिटनेस ठेवा असे आवाहन केलं.