‘निधी वाटपात दुजाभाव केला जाणार नाही’; अजित पवार याचं मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्टीकरण
अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी शिंदे गटातील नेत्यांनी आणि आमदारांनी लावून धरली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या १२ दिवसानंतरही खाते वाटप झाले नव्हते.
नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत येताच आपल्या कामांचा धडका सुरू केला आहे. त्यांनी आज आपल्या शपथविधीनंतर तिसऱ्या ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमात’ हजेरी लावली. नाशिकमध्ये हा कार्यक्रमात पार पडला. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात महत्वाच्या मुद्द्याला हात घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच स्पष्टीकरण दिलं. यावेळी अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी शिंदे गटातील नेत्यांनी आणि आमदारांनी लावून धरली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या १२ दिवसानंतरही खाते वाटप झाले नव्हते. त्यानंतर अजित पवार यांनी दिल्ली दौरा केला आणि खाते वाटप पार पडलं. यानंतर अजित पवार यांनी नाशकात या कार्यक्रमात निधी वाटपावरून स्पष्टच बोलून दाखवला. यावेळी त्यांनी निधीवाटपात कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. तर कुणाची तक्रार असल्यास त्यांचं निरसन करू असे आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. तर आधी काही चुका झाल्या असल्यास त्यातही सुधारणा करू असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री कठीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.