शरद पवार यांची येवलेकरांना भावनिक साद; म्हणाले, ‘पुन्हा चूक करणार नाही’
त्यानंतर थेट शरद पवार यांच्याविरोधात जात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समावेश केला. त्यानंतर शरद पवार हे पुन्हा आपल्याकडे असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुर्ण बांधणीसाठी बाहेर पडले आहेत.
नाशिक : राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर थेट शरद पवार यांच्याविरोधात जात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समावेश केला. त्यानंतर शरद पवार हे पुन्हा आपल्याकडे असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुर्ण बांधणीसाठी बाहेर पडले आहेत. याचपार्श्वभूमिवर पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मतदार संघात पहिली सभा घेत अनेकांवर वार केले आहेत. यावेळी यावेळी त्यांनी थेट मतदारांनाच भावनिक साद घातली. त्यानी, मी येथे कोणावर टीका करण्यासाठी नाही कर तुमची माफी मागण्यासाठी आलो आहे असे म्हटलं आहे. तर आज पर्यंत माझा कधी अंदाज चुकला नाही. पण एका नावाने माझा अंदाज चुकवला. ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. तुम्ही फक्त माझ्या विचारांवर विश्वास ठेवून मतदार केलंत. त्यामुळेच आज तुम्हाला यातना होत आहेत. त्यासाठीच मी माझं कर्तव्य म्हणून तुमच्या समोर आलो आले. सर्वांची माफी मागायला आलो आहे. पण आता पुन्हा इथं येऊन चूक करणार नाही असही पवार म्हणालेत.