राऊत यांच्या हल्लाबोलवर अजित पवार यांचा पलटवार, म्हणाले, या अफवा, ‘यात तसूभर देखील सत्य नाही’

राऊत यांच्या हल्लाबोलवर अजित पवार यांचा पलटवार, म्हणाले, या अफवा, ‘यात तसूभर देखील सत्य नाही’

| Updated on: Jul 15, 2023 | 3:52 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले. मात्र दिल्लीनं यांचं काहीही ऐकलं नाही. उलट त्यांनी तंबी देत राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा असे सुनावल्याचं सांगण्यात आलं असून अजित पवारांना अर्थखातं द्यायचं नसेल, तर अर्थखातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे द्या असा प्रस्ताव दिल्याची पक्की माहिती आहे.

नाशिक : अजित पवार यांच्या सत्तेत जाण्याने शिंदे गटाची कोंडी आणि गोची झाल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले. मात्र दिल्लीनं यांचं काहीही ऐकलं नाही. उलट त्यांनी तंबी देत राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा असे सुनावल्याचं सांगण्यात आलं असून अजित पवारांना अर्थखातं द्यायचं नसेल, तर अर्थखातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे द्या असा प्रस्ताव दिल्याची पक्की माहिती आहे. या प्रस्तावामुळेच शिंदे माघारी फिरलेत असा दावा राऊत यांनी केला आहे. तर अर्थखात्याचा कौल अजित पवारांच्या बाजूनेच पडला. जेव्हा हट्ट धरण्यात आला, तेव्हा दिल्लीनं यांना दोन पर्याय दिले. एक हा नाहीतर तो यामुळेच शिंदे गटाची माघार झाल्याचे राऊत म्हणालेत. यादरम्यान राऊत यांच्या या दाव्यावरून प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, याबाबत आपल्याला काही माहिती नाही. तर या सर्व अफवा आहेत. त्यावर काहिही विश्वास ठेऊ नका. कारण नसताना, चर्चा करून वातावरण गढूळ करण्याचे काम असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 15, 2023 03:52 PM