बंडखोरीनंतर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला? अचानक पहिल्यांदाच सिल्व्हर ओकवर!
त्यानंतर त्यांनी थेट पक्षावरच आपला दावा सांगत, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता राजकारणातून निवृत्ती घ्या अशी टीका केली होती. तर थेट शिंदे-फडणवीस सरकारला पांठिबा दिला होता. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. त्यानंतर त्यांनी थेट पक्षावरच आपला दावा सांगत, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता राजकारणातून निवृत्ती घ्या अशी टीका केली होती. तर थेट शिंदे-फडणवीस सरकारला पांठिबा दिला होता. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. यानंतर शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर निघत पुन्हा एकदा पक्ष बांधणीच्या कामाला लागले तर त्यांनी देखील बंडखोर आमदार आणि अजित पवार यांचा वेळोवेळी समाचार घेतला. यानंतर आता अजित पवार हे अचानकच सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने राज्यात विविध चर्चांना उत आला आहे. तर अजित पवार हे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तर ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगितलं जात आहे. प्रतिभा पवार यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. तर त्यांच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी घरी सोडल्यानंतर अजित पवार यांनी सिल्व्हर ओकवर दाखल होत प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.