कंत्राटी पोलिस भरतीचं काय? होणार की नाही? फडणवीस याचं मोठे विधान, म्हणाले- ‘भरती कंत्राटी पद्धतीने…’
पावसाळी अधिवेशनात जोरदार वादंग झाला आहे. तर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन सादर केलं.
मुंबई, 27 जुलै 2023 | महाराष्ट्रात आता पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने अशा आशयाखाली काही बातम्या आल्याने विरोधकांनी सरकारला घेण्याचे काम केलं आहे. त्यावरून पावसाळी अधिवेशनात जोरदार वादंग झाला आहे. तर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन सादर केलं. यावेळी फडणवीस म्हणाले हे तात्पुरत्या स्वरूपाचे आउटसोर्सिंग आहे. ही काही परमनंट भरती नाही. त्यामुळे राज्यात पोलिसांची भरती कंत्राटी पद्धतीने होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या निवेदनात, ही भरती जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी असेल. तर ती तात्पुरत्या स्वरुपाची आहे. नियमित पोलीस शिपाई उपलब्ध झाल्यानंतर यांची सेवा संपुष्टात येईल. तसेच त्यांच्याकडे कायदेविषयक अंमलबजावणी आणि तपासाचे कुठलेही काम दिले जाणार नाही अशीही ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे.