काहीच संबंध नसेल तर शिंदेंच कार्यालय टॉप बुकिंगच्या जागेत कसं : सुषमा अंधारे
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करणारी अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हीला पोलिसांनी अटक झाली असून, अनिल जयसिंघानी फरार आहे
नांदेड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार समोर आला. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करणारी अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हीला पोलिसांनी अटक झाली असून, अनिल जयसिंघानी फरार आहे. यानंतर याप्रकरणी अनेकांनी टीका केली आहे. तर खरं प्रकरण काय आहे हे उजेडात आलं पाहिजे असेही मागणी होत आहे. यावरून मुखेड इथल्या महाप्रबोधन यात्रेत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे. तसेच श्रीकांत शिंदे यांचे संपर्क कार्यालय टॉप बुकिंगच्या जागेत कसं असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. तर याबाबत एकदा फडणवीस यांनी खात्री करावी. जयसिंघानी हा उल्हासनगर मधला माणूस 2015 साली एकनाथ शिंदे यांनीच मातोश्रीवर आणला. एकनाथ शिंदे यांचे आणि जयसिंघानीचे काय संबंध आहेत?