Devendra Fadnavis : ‘मुसक्या आवळाच काँग्रेस नेत्याच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, त्याला भर रस्त्यात फाशी’
सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा गुन्हेगार मोकाट आहे. त्याच्यावर आजूनही कारवाई केली जात नाही. पण राहुल गांधी असे काय बोलले की त्यांना दोन वर्षांची शिक्षा होते. असं लिहणाऱ्याच्या मुसक्या आवळा अशी मागणी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
मुंबई, 27 जुलै 2023 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत आक्षेपार्ह लेखन प्रकरणावरून आज सभागृहात गदारोळ माजला. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा गुन्हेगार मोकाट आहे. त्याच्यावर आजूनही कारवाई केली जात नाही. पण राहुल गांधी असे काय बोलले की त्यांना दोन वर्षांची शिक्षा होते. असं लिहणाऱ्याच्या मुसक्या आवळा अशी मागणी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. तर सरकार अजून शांत का असा सवाल त्यांनी केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडताना, तुम्हाला फक्त मुसक्या आवळाव्या वाटतात आम्हाला तर अशांना भर रस्त्यात फाशी द्यावी वाटते. पण आपल्याला कायद्याचं पालणं करावं लागतं. तुमच्या आणि आपल्या भावना कितीही तीव्र असल्यातरिही त्याच्यावर कारवाई केली जाईल. ट्विटर इंडियाच्या मागे लागून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याचा शोध घेतला जाईल तर त्यांच्या मुसक्याच आवळल्या जातील असेहीफडणवीस यांनी म्हटलं आहे. तर यावेळी सभागृहात आणखीन काय झालं यासाठी पाहा हा व्हिडीओ…