राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदाचा गोंधळ? फडणवीस यांचा निशाना; म्हणतात ‘ओबीसी चेहरे केवळ’
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते पद नको म्हणत अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. यानंतर छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना द्यावे, अशी मागणी केली.
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयावरून मतभेद असल्याचे समोर येत आहेत. त्यातच आता प्रदेशाध्यक्षपदावरूनही गदारोळ सुरू असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते पद नको म्हणत अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. यानंतर छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना द्यावे, अशी मागणी केली. या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी नगरमध्ये झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीवर टीका करताना, एका सामान्य ओबीसी कुटुंबातील मुलगा आज देशाचा पंतप्रधान बनला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसी चेहरे हे केवळ दिखाव्यासाठी आहेत. तर राष्ट्रवादीत ओबीसींना पदं दिली जात नाहीत असा दावा करताना टीका केली आहे.