उद्धव ठाकरे यांच्या सोबतही एक मंथरा आहे...त्याचं काय होईल, देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

उद्धव ठाकरे यांच्या सोबतही एक मंथरा आहे…त्याचं काय होईल, देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

| Updated on: Jan 14, 2024 | 8:32 PM

शिवसेना नेते उद्धव ठाकर यांनी बाबरी मशिद देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाने नक्कीच पडली असेल अशी टीका केली होती, त्यास उपमुख्यमंत्री यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिले आहे. रामसेवकात इतकी ताकद आहे की ते हिमालयाला हलवू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. रामाचं मंदिर हा क्षण तमात भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. कोठारी बंधूंना शहीद करणाऱ्यांच्या, ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठाणे | 14 जानेवारी 2024 : उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. हे जे राजकीय हिंदू आहेत. त्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. आमच्या रक्तातच नसानसात हिंदुत्व आहे. ज्या लोकांनी कोठारी बंधूंना शहीद केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांनी रामाला नाकारले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसेल आहेत. अरे लाज वाटली पाहीजे. पण त्यांची चुक नाही, मंथरेचं ऐकले की काय होते हे रामायणाने सांगितले. तशी एक मंथरा उद्धव यांच्यासोबत असल्याने त्यांची अवस्था काय होणार ? असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माझ्या वजनाने बाबरी पडली म्हणता. पण रामाच्या सेवकामध्ये इतकी ताकद आहे की तो हिमालय देखील हलवू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. ठाणे ही धर्मनगरी असली तरी येथे काही महाभाग रहातात. राम काय खात होते हे बाजूला ठेवा पण तुम्ही नक्कीच शेण खाता असा जोरदार हल्ला त्यांनी आव्हाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.

Published on: Jan 14, 2024 08:31 PM