शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक; फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, मी त्याला सक्षम नाही…’
तर या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ही असल्याने ते आता सत्तेत जातील अशीही चर्चा रंगली आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद, 13 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठकीनं सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापवलं आहे. तर या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ही असल्याने ते आता सत्तेत जातील अशीही चर्चा रंगली आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये यावर प्रतिक्रिया देताना, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल मला काहीही माहिती नाही किंवा त्या भेटीबद्दल काहीही तपशील माझ्याकडे नाही. त्यामुळे याबाबत मी काहीही बोलू शकत नाही. मी तुमच्या ज्ञानात भर घालू शकत नाही. त्याला मी सक्षम नाही असं त्यांनी म्हटलं आहे. Sharad Pawar-Ajit Pawar Meeting
Published on: Aug 13, 2023 01:44 PM
Latest Videos