Maharashtra Monsoon Session : अधिवेशनात गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गटासह विरोधकांचा आक्षेप कायम; फडणवीस म्हणाले…
आज ही गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदावरून विरोधक गदारोळ करतील असेच दिसत होते. त्याप्रमाणे ठाकरे गटाकडून अनिल परब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कडवा विरोध करत गोऱ्हे यांना या पदावर बसताच येणार नाही असं म्हटलं.
मुंबई, 18 जुलै 2023 | राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन काल पासून सुरू झाले आहे. तर काल पासूनच विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याचं पक्क करत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घेरलं होतं. तर विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. आज ही गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदावरून विरोधक गदारोळ करतील असेच दिसत होते. त्याप्रमाणे ठाकरे गटाकडून अनिल परब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कडवा विरोध करत गोऱ्हे यांना या पदावर बसताच येणार नाही असं म्हटलं. त्यावरून आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस देखील वादळी ठरला आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोऱ्हे यांना पदावरुन हटवता येणार नाही असं म्हटलं आहे. तर सदस्यपदी निवडून आल्यापासून आत्तापर्यंत गोऱ्हे या शिवसेनेतच आहेत. त्यामुळे पक्षांतराचा प्रश्न कुठेही निर्माण झालेला नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील शिवसेनेकडे असून तिच ओरिजनल पॉलिटिकल पार्टी आहे.