Kishori Pednekar | घराणेशाही काय आहे हे एकदा भाजपनं स्वत:च्या पक्षातही डोकावून बघावं – tv9
पेडणेकर यांनी फडणवीसांवर हल्लाबोल करताना, घराणेशाही काय आहे हे एकदा भाजपनं स्वत:च्या पक्षातही डोकावून बघावं असा घणाघात केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारण फोडला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच महापालिकेत घराणेशाही सुरू आहे. ती मोडीत काढून आता ही महापालिका मुंबईकरांच्या हातात द्यायची आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर आता मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. तसेच पेडणेकर यांनी फडणवीसांवर हल्लाबोल करताना, घराणेशाही काय आहे हे एकदा भाजपनं स्वत:च्या पक्षातही डोकावून बघावं असा घणाघात केला आहे. त्याचबरोबर आपल्या पक्षात नक्की कोणती शाई आहे हे ही तपासावं. कॅमलची आहे की आणखी कोणती. कारण आपल्या स्वतःच्या पक्षात पाहिजे त्या सगळ्या घराणेशाही दिसत आहेत. तर भ्रष्टाचाराचे जेवढ्यावर तुम्ही आरोप केलात त्या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आता तुमच्याकडे गोदीत घेऊन त्यांना पावन केल्याचा टोला ही लगावला आहे. तसेच यावेळी, जर तुम्ही भ्रष्टाचारी म्हणत असाल तर तुमच्या पक्षाला हे भ्रष्टाचारी कसे चालले असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.