Devendra Fadnavis | अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला नव्हताच, भाजपसोबतच बेईमानी झाली होती : फडणवीस
आमच्या सोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करत असतील तर यापेक्षा जास्त मोठा विश्वासघात काय असू शकतो, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्मुला कधीच नव्हता. मी पहिल्या दिवसापासून साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मी केल्या आहे. कधीही अडीच वर्षाचा फॉर्मुला नव्हता. आता ती वेळ निघून गेली आहे. मात्र मला कधी कधी कधी आश्चर्य वाटते की, ते बेईमानीचा आरोप करतात. मात्र सर्वात मोठी बेइमानी तर आमच्यासोबत झाली आहे. आमच्या सोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करत असतील तर यापेक्षा जास्त मोठा विश्वासघात काय असू शकतो, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Aug 14, 2022 08:52 PM
Latest Videos