देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरे गटाबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”संपूर्ण ठाकरे गटच…”
भाजपने खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आणि 13 तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा उल्लेख करण्यात आला. तसंच मिंधे गटात 22 आमदार आणि नऊ खासदार अस्वस्थ आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका करताना सूचक वक्तव्य केलं आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर आज निशाना साधण्यात आला होता. त्यात भाजपने खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आणि 13 तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा उल्लेख करण्यात आला. तसंच मिंधे गटात 22 आमदार आणि नऊ खासदार अस्वस्थ आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका करताना सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी, संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे. तीन-चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे. त्याच ठाकरे गटातल्या की त्याच संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल. असं म्हणत टोला लगावला आहे. तर शिवसेना किंवा एनसीपी असेल त्यांना माहित आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्यं त्यांच्याकडून केली जात आहेत मात्र कारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो असा घणाघात त्यांनी केला आहे.