फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला घणाघात; म्हणाले, ”याची प्रचिती पुन्हा एकदा आली”
त्याचा लाभ हा होताना दिसत आहे. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपले सरकार आल्याचे ते म्हणाले. खरेतर 2019 साली महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीला जनतेने निवडून दिले होते.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला करताना, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कल्याणकारी सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याचा लाभ हा होताना दिसत आहे. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपले सरकार आल्याचे ते म्हणाले. खरेतर 2019 साली महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीला जनतेने निवडून दिले होते. पण खुर्चीच्या मोहापायी उद्धव ठाकरे पदाकडे आकृष्ट झाले आणि काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नादाला लागले. पण इतिहास आहे जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागला त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. त्याची प्रचिती महाराष्ट्राला पुन्हा एकदा आल्याची टीका त्यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे. ते नागपूर दौऱ्यावर असताना बोलत होते. तसेच ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी खुर्चीच्या मोहपायी काँग्रेस-राष्ट्रवादी संगत केली. हिंदुत्वाचा विचार सोडला. त्याचा परिणाम राज्यात मविआचे सरकार आले. पण काय झालं. आज हिंदुत्ववादी लोकांनी एकत्र येऊन बनवलेले सरकार म्हणून शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात काम करत आहे, असे फडणवीस म्हणाले.