‘वज्रमुठी’मुळे त्यांची दातखिळी बसेल; फडणवीसांच्या टीकेला ठाकरे गटाच्या खासदाराचे प्रत्युत्तर
संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही केवळ महाविकास आघाडी एकत्र येऊ नये म्हणून प्लॅन करण्यात आली. मात्र ती मोठ्या पार पडली. त्या सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला
वाशिम : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममधील सभेत ‘वज्रमूठ’ सभेवरून खोचक टीका केली होती. त्यांनी मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली, आमची विकासाची असे म्हटलं होतं. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सावंत यांनी, संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही केवळ महाविकास आघाडी एकत्र येऊ नये म्हणून प्लॅन करण्यात आली. मात्र ती मोठ्या पार पडली. त्या सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता नागपूरमध्ये आमची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. ही सभा होऊ नये यासाठी भाजप कडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नेमक्या भेगा कोणाला पडल्या आहेत हे दिसतेय आहे. तर भाजपाने ‘वज्रमूठ’ सभेचा धसका घेतला असून याच ‘वज्रमुठी’मुळे त्यांची दातखिळी बसेल, असेही सावंत यांनी म्हटलं आहे.
Latest Videos