VIDEO | फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द? जाहिरातीचं कारण की आणखी काही? राजकीय चर्चांना उधाण
कल्याण लोकसभा मतदारसंघावरून तर थेट खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनाम्याची भाषा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपमध्ये लागली आहे. शिवसेनेच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोच नाही. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.
कोल्हापूर : राज्यातील भाजप-शिवसेना युतीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू असल्याचे समोर येत आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघावरून तर थेट खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनाम्याची भाषा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपमध्ये लागली आहे. शिवसेनेच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोच नाही. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याचदरम्यान आता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या फडणवीसांनी त्यांचा अचानक दौरा रद्द केला आहे. त्यामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांनी. यावेळी, फडणवीस यांना काणाचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना हवाई प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे विमान तयार असता त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याची गरज नाही. तसेच शिंदे सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांना काढले जाणार नाही असा उल्लेख देखील त्यांनी केला.