Nanded : 'पोलीस भरती झालीच पाहिजे!' देवेंद्र फडणवीसांसमोरच तरुणांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Nanded : ‘पोलीस भरती झालीच पाहिजे!’ देवेंद्र फडणवीसांसमोरच तरुणांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

| Updated on: Sep 17, 2022 | 11:06 AM

Nanded Devendra Fadnavis : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे फडवणीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी एकच गोंधळ उडाला.

नांदेड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या देखतच काही तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना काही तरुणांवर सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवावं लागलं. देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये (Nanded) असताना हा प्रकार घडला. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती केव्हा सुरु होणार? असा सवाल यावेळी जमा झालेल्या तरुणांनी उपस्थिती केला. टीव्ही 9 मराठीने या तरुणांचं म्हणणं जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे फडवणीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तरुणांवर लाठीचार्ज केला. मराठा मुक्तसंग्रामाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे नांदेडमध्ये आले होते. या कार्यक्रमानंतर ते मोदींच्या आयुष्यावर चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला.

Published on: Sep 17, 2022 11:06 AM