शरद पवार गटाला धक्का; नाशकातील आनखी ‘एक’ आमदार अजित पवार गटाच्या गळाला
राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावत महाराष्ट्राचा दौरा आखला आहे. यारदम्यान अनेक आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित पवार गटात गेले. तर काही आमदार आजही शरद पवार यांच्याबरोब आहेत.
नाशिक : अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसच आपल्या सोबत नेली. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावत महाराष्ट्राचा दौरा आखला आहे. यारदम्यान अनेक आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित पवार गटात गेले. तर काही आमदार आजही शरद पवार यांच्याबरोब आहेत. तर काही आमदारांनी आपली तटस्थ भूमिका ठेवली होती. यादरम्यान तटस्थ असणाऱ्या आमदारांना योग्य भूमिका घ्या अशी सूचना शरद पवार गटाकडून तटस्थ आमदारांना कळविण्यात आली होती. याचदरम्यान नाशिकमधील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत हे जाहीर केलेलं नव्हतं. पण आज अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नाशकाच्या पहिल्याच दौऱ्यात अहिरे यांनी आपण अजित पवार गटात जात असल्याचं जाहिर केलं आहे. तसेच त्यांनी यावेळी मतदारसंघातील विकासासाठी अजित दादांसोबत असल्याचे स्पष्ट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांना मानणारे सहाही आमदार अजित पवार गटात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपली पाठिंबा घोषित करताना, शरद पवार हे वडिलांसारखे असून अजित दादा भावासारखे आहेत. तर मतदार संघातील विकास खुंटला असून अनेक विकास काम थांबून आहेत. ही विकास काम सुरू होण्यासह विकास कामांना गती मिळण्यासाठी सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटलं आहे.