पाणी का पाणी करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार नार्को टेस्ट करून घ्यावी : अनिल बोंडें

पाणी का पाणी करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार नार्को टेस्ट करून घ्यावी : अनिल बोंडें

| Updated on: Jan 05, 2023 | 8:41 PM

गाडी जाळपोळ प्रकरणी दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. असं वाटत असेल तर देवेंद्र भुयार यांनी स्वतःच पोलिसांसमोर जावं. आपली नार्को टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला अनिल बोंडे यांनी दिला आहे

अमरावती : 2019 मध्ये देवेंद्र भुयार यांच्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केला. तसेच त्यांचे वाहन पेटवून दिल्याची तक्रार आमदार देवेंद्र भुयार यांच्या चालकानं पोलिसांत केली होती. त्यानंतर आता त्यांचीच नार्को टेस्टच्या मागणी करण्यात येत आहे. ही मागणी वरुड येथे सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यानंतर आता खासदार अनिल बोंडे यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर टीका केली आहे.

खासदार अनिल बोंडे यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर टीका करताना, त्यांच्या सारख्या लोकशाही प्रक्रियेला अशा काळीमा फासणारा लोकप्रतिनिधी विधानसभेत जाताच कामा नये.

तसेच गाडी जाळपोळ प्रकरणी दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. असं वाटत असेल तर देवेंद्र भुयार यांनी स्वतःच पोलिसांसमोर जावं. आपली नार्को टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला अनिल बोंडे यांनी दिला. तर सत्य समोर आलं तर आपल्याला आनंद होईल असेही ते म्हणाले.

Published on: Jan 05, 2023 08:41 PM