“41 कोटींच्या विकास कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती”, आमदार देवेंद्र भुयार यांचा गंभीर आरोप
देवेंद्र भुयार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे सरकारने कामांना स्थगिती दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई : मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Buyar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे सरकारने कामांना स्थगिती दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 39 कोल्हापुरी बंधारे आणि द्वारयुक्त सिमेंट बंधारे निर्माण करण्यासाठी 41 कोटी 29 लाख रुपये महाविकास आघाडी सरकारने मंजूर केले होते. पण त्या कामांना शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis) मतदारसंघातील तब्बल 41 कोटींच्या बंधाऱ्यांच्या कामांना स्थगिती दिली आहे, असं म्हणत भुयार यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. पण मी मतदारसंघातील विकासकामं स्थगित होऊ देणार नाही. शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा सुरूच ठेवणार, असंही भुयार म्हणावेत.
Published on: Oct 04, 2022 11:34 AM
Latest Videos