आधी बैठक, मग पहाटेचा शपथविधी, शरद पवार यांची 'ती' खेळी, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

आधी बैठक, मग पहाटेचा शपथविधी, शरद पवार यांची ‘ती’ खेळी, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jun 29, 2023 | 8:04 AM

2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीने खळबळ माजली होती. मात्र अजित पवार यांनी माघार घेतल्याने फडणवीस-पवारांचं हे सरकार अवघ्या काही तासांत कोसळलं. दरम्यान त्यावेळी पडद्यामागे काय सुरु होतं? यात शरद पवार यांची खेळी होती का? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीने खळबळ माजली होती. भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गाजला होता. मात्र अजित पवार यांनी माघार घेतल्याने फडणवीस-पवारांचं हे सरकार अवघ्या काही तासांत कोसळलं. दरम्यान त्यावेळी पडद्यामागे काय सुरु होतं? यात शरद पवार यांची खेळी होती का? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या घडामोडींबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “शरद पवार यांनी आमचा डबल गेम…” नेमकं फडणवीस काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

Published on: Jun 29, 2023 08:04 AM