Special Report| गद्दारी की मुत्सद्देगिरी? शरद पवार- देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

Special Report| गद्दारी की मुत्सद्देगिरी? शरद पवार- देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

| Updated on: Jun 27, 2023 | 9:37 AM

'मुत्सद्देगिरी की गद्दारी' यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. 1978 चा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर यांनी "फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत होते. त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती नाही," अशी टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

मुंबई: ‘मुत्सद्देगिरी की गद्दारी’ यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. “1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी?” असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी “फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत होते. त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती नाही,” अशी टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “शरद पवार म्हणाले ते खरं आहे. मी 1977 मध्ये प्राथमिक शाळेतच होतो. पण…” देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना नेमकं काय म्हणाले? यासाठी हा स्पेशल रिपोर्ट नक्की पाहा…

Published on: Jun 27, 2023 09:37 AM